पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

0
119

भोसरी,  दि. 15 (पीसीबी)

जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि. 14) एमआयडीसी भोसरी येथे घडली.

प्रफुल्ल गौतम जाधव (वय 25, रा. भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल भगवान गवारगुर (वय 20, रा. एमआयडीसी भोसरी), अजय नितीन शेजोळ (वय 22), गौरव शेषराव शेजोळ (वय 23, दोघे रा. कात्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी फिर्यादी प्रफुल्ल आणि त्यांचा मित्र समाधान वानखेडे पायी चालत कामासाठी जात होते. एमआयडीसी भोसरी मधील टी ब्लॉक येथे आल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवले. रविवारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कुणाल याने कोयत्याने प्रफुल्ल यांच्या डोक्यात, पाठीवर आणि खांद्यावर वार केले. इतर आरोपींनी प्रफुल यांना पकडून ठेवले. गौरव याने रॉडने प्रफुल्ल यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. कुणाल याने कोयता हवेत फिरवून ‘मी फुलेनगरचा भाई आहे. तू मला ओळखत नाही का. तू माझ्याशी पंगा का घेतला. तुला आता जिवंत सोडणार नाही. तुला वाचवायला कोणी आले तर त्यालाही सोडणार नाही’ अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.