हिंजवडी, दि. 15 (पीसीबी) : मेट्रोचे बांधकाम सुरू असताना अज्ञात चोरट्याने चार लाख ५४ हजार ५०२ रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना २ एप्रिल ते ३० जुलै २०२४ या कालावधीत बालेवाडी स्टेडिअमजवळ घडली.
विजय सुखदेव सांगळे (वय ३३, रा. असवानी गॅलॅक्सी सिटी रोड, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी स्टेडिअमजवळ मेट्रोचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्याने चार लाख ५४ हजार ५०२ रुपयांचे मेट्रोच्या बांधकामाचे साहित्य चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.










































