इंदापूर तालुक्यातील ‘जंक्शन’ ‘एमआयडीसी’चा प्रश्न मार्गी;

0
71

एमआयडीसी’साठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करुन देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

आमदार दत्तात्रय भरणेंसह इंदापूरकारांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : इंदापूर तालुक्यातील प्रस्तावित जंक्शन ‘एमआयडीसी’साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील 131 हेक्टर 50 आर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने जंक्शन ‘एमआयडीसी’चा प्रश्न मार्गी लागला असून इंदापूरकरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह इंदापूर तालुक्यातील जनतेने उपुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, इंदापूर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जंक्शन येथील एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती. या एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील मौजे जंक्शन येथील 20 हेक्टर 38 आर., मौजे भरणेवाडी येथील 24 हेक्टर 24 आर., मौजे अंथुर्णे येथील 21 हेक्टर 18 आर., मौजे लासुर्णे येथील 65 हेक्टर 70 आर. अशी एकूण 131 हेक्टर 50 आर एवढे क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूरसह बाजूच्या बारामती, फलटण तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन इंदापूर तालुक्याचा हा प्रश्न मार्गी लावला आहे, त्यामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह इंदापूरकरांनी उपुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.