बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर; महागड्या गाड्या, आलिशान घर….

0
28

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.30 वाजता तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांचं राजकारणाबरोबरच बॉलिवूडमध्येही खास कनेक्शन होतं. बाबा सिद्दीकी त्यांच्या आलिशान जीवनशैली आणि स्टार-स्टडेड हाय-क्लास पार्ट्यांसाठी आणि बॉलिवूड इफ्तार पार्टीसाठी ओळखले जायचे. अशात बाबा सिद्दीकींच्या संपत्तीचा आकडा समोर समोर आला आहे.

बाबा सिद्दीकी यांची एकूण संपत्ती अंदाजे 7.2 दशलक्ष असल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात त्यांची एकूण संपत्ती किती याविषयीची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूड क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटींसोबत चांगले संबंध होते. त्यांच्या इफ्तार पार्टीत झाडून अनेक स्टार दिसत. 2018 मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यावेळी जवळपास 462 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बाबा सिद्दीकींची संपत्ती ही 76 कोटी एवढी आहे. मात्र, त्याच्या खऱ्या संपत्तीची अचूक माहिती अद्याप कुठेही उपलब्ध नाहीत.

2018 मध्ये, ईडीने सिद्दीकी यांची 462 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीने मुंबईतील सिद्दीकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्सचे सुमारे 462 कोटी रुपयांचे 33 फ्लॅट जप्त केले होते त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अनियमितता आणि मनी लाँड्रिंगसारख्या कामांबाबत ही कारवाई करण्यात आली होती. हा कथित घोटाळा सुमारे 2000 कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. पिरॅमिड डेव्हलपर्स ही बाबा सिद्दीकी यांची शेल कंपनी होती.