पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
95

पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : देवीच्या मिरवणुका पाहून पायी चालत घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा सहा लाखांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री नऊ वाजताच्या सुमारास प्रियदर्शनी शाळेसमोर नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण दसऱ्यानिमित्त निघालेल्या देवीच्या मिरवणुका पाहून रात्री नऊ वाजताच्या सुमारास पायी चालत घरी जात होत्या. नेहरूनगर येथील प्रियदर्शनी शाळेसमोरून जात असताना समोरून मोपेड दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सहा लाख 30 हजार रुपये किमतीचे नऊ तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.