थेरगाव मध्ये ‘खून का बदला खून’

0
151

धारदार शस्त्राने वार तसेच दगडाने ठेचून तरुणाचा खून

वाकड, दि. 14 (पीसीबी) : भावाचा खून केल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत दगडाने ठेचून त्याचा खून केला. ही घटना रविवारी (दि. १३) सकाळी आठ वाजताच्या सुमारास जगताप नगर थेरगाव येथे उघडकीस आली.

साहिल राहुल साबळे (वय १८, रा. बौद्ध नगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी साहिल याच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरुण परदेशी (रा. काळेवाडी), ओमकार कामत, लक्ष्मण कोळी, साहिल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), तीन अल्पवयीन मुले आणि त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल साबळे याने मागील काही दिवसांपूर्वी गणेश उर्फ दादू शांताबाई रोकडे याचा खून केला होता. त्याचा राग मनात धरून या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने आरोपींनी कट रचून साहिल साबळे याला जगताप नगर थेरगाव येथे त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.