एकेरी शब्दात हाक मारल्याने एकास मारहाण

0
110
crime

चिखली, दि. 13 (पीसीबी)

एकेरी शब्दात हाक मारल्याने दुकानदाराने एकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.

श्रीमंत शिवाजी सलगर (वय 44, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार न्यू किस्मत मटन शॉपचे मालक चाचा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीमंत सलगर शनिवारी सकाळी नऊ वाजता अंगणवाडी रोड मोरेवस्ती येथे न्यू किस्मत मटन शॉपवर मटण आणण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी आरोपीला ‘ए मला मटन दे रे’ असे एकेरी म्हटले. या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने पायावर व हातावर मारहाण करून दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.