पतीची पत्नीला बेदम मारहाण

0
106

पिंपरी,दि. 13 (पीसीबी)

पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पिंपरी उड्डाणपुलावर घडली.

गणेश बबन दाभाडे उर्फ देवाडे (वय 30, रा. आंबेडकर कॉलनी पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश दाभाडे याने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीच्या डोक्याच्या मागील बाजूला, कपाळावर व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. गणेश याने पत्नीला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.