कारचा दुचाकीला धक्का लागल्याने महिलेस मारहाण

0
96
crime

दिघी, दि. 13 (पीसीबी)

कारचा दुचाकीला धक्का लागल्याने एका टोळक्याने महिलेला आणि तिच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास तापकीर चौक ते देहू फाटा चौक आळंदी येथे घडली.

अविनाश जगताप, ओम जगताप, अप्पू भिवरे, प्रणित जगताप, गौरव तापकीर आणि त्यांचे पाच ते सात साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 41 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कारमधून जात असताना त्यांच्या कारचा धक्का अविनाश जगताप याच्या दुचाकीला लागला. त्या कारणावरून अविनाश जगताप आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीचा पाठलाग करून कारवर दगड मारले. यामध्ये कारचे नुकसान झाले. आरोपींनी महिलेला शिरगाळ करत त्यांचा विनयभंग केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.