भरधाव दुचाकीची झाडाला धडक

0
63

दुचाकी वरील दोघांचा मृत्यू

हिंजवडी, दि. 13 (पीसीबी)

भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची एका झाडाला धडक बसली. या अपघातात दुचाकी वरील दोघांचाही मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 11) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हिंजवडी येथे घडला.

सौरभ यादव (वय 27, रा. हिंजवडी), अनुराग पांडे (वय 27, रा. हैदराबाद) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस नाईक अरुण पारधी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ यादव हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन हिंजवडी चौकाकडून फेज वन सर्कलकडे भरधाव वेगात जात होता. इंडियन थाळी हॉटेल समोरील फुटपाथवर असलेल्या एका झाडाला सौरभ याच्या दुचाकीची जोरात धडक बसली. या अपघातात सौरभ आणि दुचाकी वरील सहप्रवासी अनुराग पांडे या दोघांचाही मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.