बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!

0
57

पिंपरी, दि. १३ (पीसीबी)राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला लागली. तर दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सध्या पोलिसांकडून तीन वेगवेगळ्या अँगलमधून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास केला जात आहे.

या बातमीमुळे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळब माजली आहे. राजकीय क्षेत्रच नव्हे तर संपूर्ण बॉलिवूडलाही या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध होतं.
सलमान खानचा मोठा निर्णय

बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची आणि त्यांच्या मृत्यूची भयानक बातमी समजताच सलमान खान याने बिग बॉस 18 चं शूटिंग अचानक कॅन्सल केलं. या रिॲलिटी शो चं शूटिंग सुरू असताना मध्यातच सलमानला सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजली आणि तत्काळ शूटिंग थांबवत लमान खान लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला.
बॉलिवूड हादरलं

बाबा सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजताच बॉलिवूडलाही धक्का बसला. बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त सर्वप्रथम लीलावतीमध्ये पोहोचला. त्यानंतर थोड्यावेळाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी पतीसह रुग्णालयात पोहोचली. चित्रपटसृष्टीत सिद्दीकी यांचे अनेक मित्र असून दरवर्षी सिद्दीकी यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या इफ्तार पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात.

बाबा सिद्दीकींची हत्या एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे सलमान खान गोळीबार कनेक्शन असून बिश्नोई गँगचा यात हात असल्याचीही माहिती समोर येत आहे.