दोन महिलांचे दागिने हिसकावले

0
132

वाकड,दि. 10 (पीसीबी) : दुचाकीवरून आलेल्‍या दोन चोरट्यांनी दोन महिलांच्‍या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 7) रात्री वाकड येथे घडली.

याबाबत वाकड येथे राहणार्‍या 53 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 8) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बुलेट दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी या मंगलनगर, वाकड येथून सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास पायी चालल्‍या होत्‍या. त्‍यावेळी दुचाकीवरून आलेल्‍या दोन चोरट्यांनी त्‍यांच्‍या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे दोन 20 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

तसेच ओरीयाना सोसायटी येथे राहणार्‍या दुसर्‍या एका महिलेच्‍या गळ्यातील 40 हजार रुपये किमतीचे दहा गॅम वजनाची सोन्‍याची चैन दुचाकीवरून आलेल्‍या दोन चोरट्यांनी हिसकावून नेली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.