खंडणीची मागणी करत विद्यार्थ्याला मारहाण

0
96
crime

चाकण, दि. 08 (पीसीबी)

रस्त्यावर अडवून विद्यार्थ्याकडे एक हजार रुपयांची खंडणी मागत त्यास मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास चाकण मार्केट यार्ड जवळ घडली.

हिमांशू उमेश मिश्रा (वय 19, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर एकनाथ तनपुरे (रा. चाकण), सचिन डोंगरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिश्रा हे रविवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी जात होते. त्यावेळी चाकण मार्केटयार्ड जवळ आरोपींनी त्यांना अडवले. हाताने व हातातील कड्याने मिश्रा यांना मारहाण करून दहा हजार रुपयांची खंडणीची मागणी करत शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.