हिंजवडी, दि. 07 (पीसीबी) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास शंभर टक्के नफा देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी येथे घडली.
या प्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी व्हाट्सअप वरून संपर्क केला. त्यांना एका ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना शेअर मार्केट व आयपीओ मध्ये शंभर टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीकडून तीन लाख 4 हजार 841 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.















































