किरकोळ भांडणाच्या कारणावरून पती पत्नीला बेदम मारहाण

0
66

वाकड, दि. 07 (पीसीबी) : किरकोळ भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून पती-पत्नीला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 5) रात्री नऊ वाजताच्या सुमारास रहाटणी येथे घडली.

राहुल सुरेश गोळे (वय 42, रा. रहाटणी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित सुभाष यादव (वय 37), मोहित सुभाष यादव (वय 35), रोहन सुभाष यादव (वय 27, तिघे रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल यांच्या घराच्या पार्किंग जवळ शनिवारी सकाळी भांडण झाले. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना लोखंडी रॉड, पेंटच्या डब्याने मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी राहुल यांच्या पत्नी आल्या असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. पोलिसांनी रोहित यादव आणि रोहन यादव यांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.