घरासमोर जाऊन महिलेसह दोन मुलींना मारहाण

0
83

महाळुंगे, दि. 07 (पीसीबी) : महिलेच्या घरासमोर जाऊन महिलेसह तिच्या दोन मुलींना मारहाण केली. या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 6) सकाळी सात वाजताच्या सुमारास शिवेगाव येथे घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरी असताना आरोपी महिला त्यांच्या घरासमोर आल्या. महिलेसोबत भांडण करून शिवीगाळ केली. तसेच महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलींना मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.