रामगिरी महाराज व नरसिंहानंद महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाइची मागणी

0
72

दि. ४ (पीसीबी) – महाराष्ट्र मुस्लिम काँफ्रेंसच्या वतीने हज़रत मुहम्मद पैगम्बर साहेब यांच्या बद्दल अपमानजनक व्यक्तुत्व केल्याबद्दल रामगिरी महाराज व नरसिंहानंद महाराज यांच्यावर कायदेशीर कार्रवाही करण्यात यावी याकरिता पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन सादर.

हज़रत मुहम्मद पैगम्बर साहेब यांच्या बद्दल अपमानजनक व्यक्तुत्व करणाऱ्या महंत रामगिरी महाराज व नरसिंहानंद महाराज यांना त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे राष्ट्रिय अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांच्या वतीने पुणे पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले.
हज़रत मुहम्मद पैगम्बर साहेबांविषयी अपमानजनक शब्दांचा वापर करून देशातील मुस्लिम समाजाच्या लोकांची भावना दुखावणाऱ्या महंत रामगिरी महाराज व नरसिंहानंद महाराज यांना अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात यावे हयासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी सुमारे साठ (60) मुस्लिम समाजातील नेते उपस्थित होते. यानिवेदनामध्ये हाजी जुबेर मेमन यांनी रामगिरी महाराज आणि नरसिंहानंद महाराज यांच्यावर कायदेशीर कार्रवाई न झाल्यास संविधानाच्या मार्गाने तिव्र बेमुद्दत आंदोलन करू अशी मांगणी केली.
सदर निवेदन देताना यावेळी महाराष्ट्र मुस्लिम काँफ्रेंसचे राष्ट्रिय अध्यक्ष हाजी जुबेर मेमन, उपाध्यक्ष एम.एम.सी. इकबाल शेख, शाहिद शेख (एमआएएम), मुफ्ती अहमद कास्मी, अहमद सय्यद, अमीर काझी, करीम मामा शेख, सुलेमान मेमन, अतीक मोमिन, फहीम मेमन आणि कादीर कुरैशी आदि उपस्थित होते.