पिंपरी, वाकड मधून तीन पिस्तूल, पाच काडतुसे जप्त

0
94

पिंपरी, दि. 4 (प्रतिनिधी)

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे तर वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करत तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 3) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कुमार भिमान्ना कुराडे (वय 22, रा. पडळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथून पिंपरी पोलिसांनी कुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार समोर ढवळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव फाटा येथून गुंडा विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. प्रफुल्ल राजेंद्र ढोकणे (वय 26, रा. चिंचवड), अभिषेक पांडुरंग गोसावी (वय 29, रा. चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख तीन हजार रुपये किमतीची दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी तौसिफ इलाही शेख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.