सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याबद्दल महिलेवर गुन्हा दाखल

0
77

दिघी, दि. 4 (प्रतिनिधी)

सार्वजनिक रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करत सार्वजनिक सभ्यतेचा भंग करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 3) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास योगीराज चौक आळंदी येथे घडला.

पोलीस अंमलदार योगेश शेळके यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे योगीराज चौक आळंदी येथून जात असताना रस्त्याच्या बाजूला थांबलेली एक तरुणी ‘येतोस का. पाचशे रुपये लागतील’, असे म्हणत अश्लील हावभाव करत होती. तरुणीने अश्लील शब्द उच्चारून सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडथळा होईल तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी कृत्य केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.