कामावर यायचे नाही म्हटल्याने वरिष्ठास बेदम मारहाण

0
117

तळेगाव, दि. ४ (पीसीबी)

कामावर यायचे नाही असे सांगितल्याने तीन जणांनी मिळून कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे घडली.

संतोष महादेव सनमुखराव, रोहन साव, कार्तिक साबळे (तिघे रा. वराळे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चंद्रमणी लालचंद शिंदे (वय 40, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे त्यांच्या मित्रांसोबत नवलाख उंबरे येथून पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी संतोष हा त्याच्या साथीदारांना घेऊन आला. संतोष याला शिंदे यांनी सोमवारी कामावर यायचे नाही असे सांगितले होते. त्या कारणावरून आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून शिंदे यांना लाथा बुक्क्यांनी डोक्यात, तोंडावर, छातीत पाठीत हातापायावर मारहाण केली. शिवीगाळ करून आरोपी निघून गेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.