राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘लोकराज्य’ चे प्रकाशन

0
83

शासनाच्या निर्णयांची समग्र माहिती

दि. ४ (पीसीबी) – लोकराज्य जुलै-ऑगस्ट 2024 अंकाचे आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती

या अंकामध्ये शासनाच्या दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मनोगत पर लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

या अंकामध्ये शासनाने आतापर्यंत घेतलेला निर्णय यांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला आहे. तसेच या अंकामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचा आढावा आणि महिला लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियांचा समावेश करण्यात आला आहे.

विविध विभागांच्या निर्णयांचा या अंकात समावेश असल्याबद्दल मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.