हर्षवर्धन पाटील यांचा अखेर भाजपाला राम राम

0
82

पुणे, दि. ४ : हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आधी भाजपाला राम राम केला. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षात जात असल्याचं जाहीर केलं. त्याआधी त्यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला. मात्र अंकिता पाटील यांनी आधीच आपण भाजपा सोडल्याचं जाहीर केलं. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश होणार हे निश्चितच मानलं जात होतं जो आता झाला आहे.

हर्षवर्धन पाटील पक्ष सोडण्यापूर्वी काय म्हणाले?
मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. असंही हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) म्हणाले. तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी निर्णय जाहीर केला.