वाकड आणि आळंदी मध्ये दारू विक्री प्रकरणी दोन कारवाया

0
106

चिंचवड,दि. ०३ (पीसीबी)

अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली. वाकड आणि आळंदी पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भीमा तुकाराम झोंबाडे (वय 57, रा. चिंचवड) याच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी मधील वेताळनगर झोपडपट्टी येथे कारवाई करत पोलिसांनी झोंबाडे याच्याकडून 3250 रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू साठा जप्त केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
अविनाश बादशाह माचरेकर (वय 42, रा. थेरगाव) याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश याच्याकडून 3900 किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.