आता अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज – अजित पवार

0
95
xr:d:DAFb06I1LDs:39,j:4551772165,t:23030114

पुणे, दि. ०३ (पीसीबी)- बारामतीत दोन दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांचा खून त्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज सकाळी बारामतीत पोहोचतात जिल्हा पोलीस प्रमुखांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये तातडीच्या उपाययोजना संदर्भात चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या वयोमर्यादेबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. आता अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे. कारण पूर्वीची मुलांची बुद्धीमत्ता आणि आजची परिस्थिती खूप वेगळी बनली आहे. या संदर्भात आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा १४ वर्षाच्या खालील गृहीत धरला जावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही सरकारच्या वतीने करणार आहोत. असे अजित पवार म्हणाले.

शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की, त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर या मुलांमधील रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्ती यामुळे देखील गुन्हे वाढत आहेत. आणि अल्पवयीन असल्याने त्यांना मोकळीक मिळते. अशा परिस्थितीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असावे. चौदा वर्षाच्या पुढील प्रत्येक युवक अथवा व्यक्ती हा सराईत अथवा थेट गुन्हेगारीमध्ये गणला गेला पाहिजे. अशी भूमिका सगळीकडे व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या विधानावर त्यांनी असहमती दर्शविली. ते म्हणाले, “एक नंबरची मुलगी चांगल्या नोकरीवाल्यांना मिळते, दोन नंबरची मुलगी पान टपरी आणि किराणा माल दुकानदारांना मिळते तर तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते” असं अवमानजनक वक्तव्य करणारे आमदार देवेंद्र भुयार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच खडसावलं. “देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे, त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर” असं अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे सहयोगी आमदार आहेत.

पवार म्हणाले, “एक मिनिट… देवेंद्रने केलेलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे, त्याला मी सांगितलं की तू दिलगिरी व्यक्त कर. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात अशा प्रकारचं वक्तव्य गेलं, ते अत्यंत चुकीचं होतं, मुलींना वेदना देणारं होतं, शेतकऱ्यांच्या बद्दल अपमान वाटणारं होतं, असं काल रात्री मला कळल्या कळल्या सांगितलं, कारण पाच वर्ष तो माझा सहयोगी म्हणून काम करत होता.” असं अजित पवार म्हणाले.

“तो शेतकरी संघटनेतून निवडून आला होता, परंतु काम करत होता. मला त्याने सांगितलं दादा, मी करतो. माझा बोलण्याचा हेतू तसा नव्हता. मला एवढंच सांगायचं होतं, की शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून त्यांना लग्नासाठी मुली.. नोकरदारांना प्राधान्य देतात. पूर्वी असा काळ होता की मुली बागायतदारांना प्राधान्य द्यायच्या. पण बोलण्याच्या ओघात तो चुकला. चूक ती चूकच आहे. त्याच्या संबंधी क्लिअर सूचना त्याला दिल्या आहेत. मी सांगितलं की मला अजिबात तुझं स्टेटमेंट योग्य वाटलेलं नाही, ते ताबडतोब मागे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त कर, माफी माग, असं सांगितलं आहे.” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.