दिवसाभीक मागायची, रात्री हॉटेलात मुक्काम करणारे २२ जणांचे टोळके

0
103

भोपाळ, दि. ३ : मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी २२ जणांच्या एका टोळीला अटक केली आहे. या २२ जणांमध्ये ११ लहान मुलांचा समावेश आहे. ही टोळी मूळची राजस्थानची आहे. पोलिसांनी त्यांची रवानगी पुन्हा त्यांच्या गावी केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा मुक्काम एका हॉटेलात असायचा.

महिला आणि बाल कल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानं पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली. ‘आम्हाला याबद्दलची एक तक्रार मिळाली होती. त्यानंतर आम्ही तपास केला. राजस्थानातील २२ जणांचा एक समूह इंदूरमध्ये आला असल्याचं आम्हाला समजलं. ते सगळे एका हॉटेलात थांबले असल्याची माहिती मिळाली. या समूहात ११ अल्पवयीन मुलांसह ११ महिलांचा समावेश होता. हे सगळे जण दिवसभर शहराच्या विविध भागांमध्ये भीक मागायचे आणि रात्री हॉटेलमध्ये जाऊन झोपायचे,’ अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.