प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल ‘बिग बॉस’मधून आउट?

0
76

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) – बिग बॉस मराठीमध्ये आता शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. मागच्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे हे बिग बॉसमधून बाहेर पडले. अशात अजून एक सदस्य घरातून बाहेर पडला असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

सध्या वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत आणि धनंजय पोवार हे बिग बॉसच्या घरात आहे. अशात मध्येच एक सदस्य घरातून बाहेर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. घरातल्या मिडवीक एव्हीक्शनमध्ये प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल घराबहेर पडली असल्याची माहिती समोर येत आहे.
अंकिता वालावलकर बिग बॉसमधून बाहेर?

सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे बिग बॉस मराठी पूर्णपणे स्क्रिप्टेड असल्याची टीका सोशल मीडियावर होऊ लागली आहे. अंकिताच्या एव्हीक्शनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंकिताला बिग बॉस मराठी विजेतीसाठी पक्की दावेदार मानलं जात होतं. अशात तीच घराबहेर पडल्याच्या वृत्ताने चाहते नाराज झाले आहेत.

पाहायला गेलं तर अद्याप कलर्स मीडियाकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. याबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी 6 स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. वोटिंग ट्रेंडसनुसार या आठवड्यात अंकिता, अभिजीत आणि सुरज यांना सर्वाधिक वोट मिळाले होते.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण

जान्हवी आणि वर्षा उसगावकार यांना मात्र कमी वोट मिळाले होते. असं असताना देखील अंकिता घराबाहेर झाल्याने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे सोशल मीडियावर बिग बॉसला आता ट्रोल केलं जात आहे. बिग बॉस मराठीच्या अनेक फॅन पेजेसनी अंकिता ही घराबाहेर पडल्याचं म्हटलं आहे. यामुळे चाहते खूप संतापले आहेत