वकील गुणरत्न सदावर्ते वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढणार

0
49

मुंबई, दि. ०३ (पीसीबी) – विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते, तशा राजकीय घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. सध्या या अनुषंगाने विविध बैठका सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये इनकमिंग आऊटगोईंग सुरु झालं आहे. तर काही उमेदवारांकडून प्रचारही सुरु करण्यात आला आहे. अशातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठी घोषणा केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. “मी वरळीतून निवडणूक लढवणार आणि आदित्य ठाकरे यांना धूळ चारणार”, असा निर्धार सदावर्ते यांनी केला आहे.