पिंपरी, दि. ०२ (पीसीबी) : उंदीर मारण्याचे औषध पिऊन विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना 13 सप्टेंबर रोजी विठ्ठल नगर झोपडपट्टी, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी मयत विवाहितेच्या 55 वर्षीय आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती गोरख रामप्रसाद जाधव (वय 30, रा. सुलतानपूर, ता. गेवराई, बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा तिच्या पतीने मानसिक व शारीरिक छळ केला. तू वांजोटी आहे. तुझ्यावर औषधोपचार केले तरी तुला बाळ होत नाही. तुझ्यामुळे आमच्या घराला वारस भेटत नाही. तुझा जिवंत राहून काही फायदा नाही. तू मरून जा. म्हणजे मी मोकळा होऊन दुसरे लग्न करतो, असे म्हणूनच छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केली. तिचा पत्ती आत्महत्येस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.










































