सराईत गुन्‍हेगाराकडून 15 दुचाकी हस्‍तगत भोसरी पोलिसांची कामगिरी

0
46

भोसरी, दि. ०२ (पीसीबी) : वाहन चोरी करणार्‍या सराईत गुन्‍हेगारास पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍याकडून तीन लाख 20 हजार रुपये किंमतीच्‍या 15 दुचाकी हस्‍तगत केल्‍या. भोसरी पोलिसांनी ही कामगिरी केली.

स्वप्निल भागवत अहिरे (वय 24, रा. गवळी नगर, चर्च समोर, भोसरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. बबन हरीभाऊ वाघमारे (रा. चिखली) याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस उपायुक्‍त स्‍वप्‍ना गोरे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 25 सप्‍टेंबर रोजी पोलीस अंमलदार स्‍वामी नरवडे आणि महादेव गोराळे यांना एकजण दुचाकीवरून संशयितरित्‍या जाताना दिसला. पोलिसांनी त्‍यास ताब्‍यात घेऊन त्‍याच्‍याकडे असलेल्‍या दुचाकीबाबत चौकशी केली. त्‍यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्‍यास ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने त्‍याकडे असलेली एमएच 14/एडी 3601 ही दुचाकी चोरीचाी असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्‍यास अटक करून सखोल चौकशी केली असता त्‍याने आपला साथीदार बबन वाघमारे याच्‍या सोबत 15 दुचाकी चोरी केल्‍याची कबुली दिली. त्‍यानुसार पोलिसांनी तीन लाख 20 हजार रुपये किंमतीच्‍या 15 दुचाकी हस्‍तगत केल्‍या. या कामगिरीमुळे भोसरी पोलीस ठाण्‍यातील सात, दिघी, चिखली आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यातील प्रत्‍येकी एक गुन्‍हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत माहावरकर, अपर आयुक्‍त वसंत परदेशी उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सचिन हिरे भोसरी पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, निरीक्षक भारत शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, अंमलदार राकेश बोयणे, मुळे, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे, अनिल जोशी, विशाल काळे यांच्‍या पथकाने केली आहे.