रिक्षा चोरून भाड्याने देणाऱ्या चोरट्याला अटक

0
82

पिंपरी, दि. ०२ (पीसीबी) : पुणे शहरातून रिक्षा चोरून त्‍या शिप्‍टने चालविण्‍यास देणाऱ्या चोरट्याला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली. त्‍याच्‍याकडून चोरीच्‍या पाच रिक्षा जप्‍त करण्‍यात आल्‍या.

अर्थव ऊर्फ यश जयवंत किंगरे (वय 20, रा. देहुगाव) असे अटक करण्‍यात आलेल्‍या चोरट्याचे नाव आहे.

पोलीस उपायुक्‍त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पोलीस अंमलदार महेश खांडे समीर रासकर यांना माहिती मिळाली की, देहुगाव परिसरातील एकजण रिक्षा चोरी करत असून तो चोरी केलेली रिक्षा शिपने चालविण्यास देत आहे. त्‍यानुसार पोलिसांनी देहुगाव परीसरात शोध घेऊन आरोपी किंगरे याला रिक्षासह ताब्यात घेतले. त्‍याकडे असलेली रिक्षा चोरीची असल्‍याचे आढळून आले. त्‍याला अटक करून चौकशी केली असता त्‍याने आणखी चार रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्‍या रिक्षांबाबत समर्थ पोलीस ठाण्‍यात दोन, बंडगार्डन, बिबवेवाडी आणि खडक पोलीस ठाण्‍यात प्रत्‍येकी एक गुन्‍हा दाखल आहे. आरोपी किंगरे हा रिक्षा चोरून त्‍या भाड्याने चालविण्‍यास देत असे. त्‍यांच्‍याकडून सात लाख 60 हजार रुपये किंमतीच्या पाच चोरीच्या रिक्षा जप्त केल्‍या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्‍त वसंत परदेशी, उपायुक्‍त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्‍त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहा पोलीस निरीक्षक अभिनय पवार, पोलीस अंमलदार महेश खांडे, औदुबर रोंगे, गणेश हिंगे, सोमनाथ मोरे, नितीन लोखंडे, राहुल खारगे, आशिष बनकर, विशाल गायकवाड, प्रविण कांबळे, नितीन उमरजकर, प्रशांत पाटील, गणेश कोकणे, चंद्रकांत गडदे, समीर रासकर, गणेश सांवत, हर्षद कदम, व सुमित देवकर यांच्‍या पथकाने केली आहे.