ॲड अय्युब शेख यांना उमेदवारीसाठी खासदार शरद पवार यांना मुस्लिम समाजाचे साकडे

0
77

पुणे, दि. ०१ (पीसीबी) : आगामी विधानसभा निवडणूक 2024 यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व करणारा सुशिक्षित मुस्लिम उमेदवार ॲड अय्युब शेख यांना उमेदवारी देऊन मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी चाळीस वर्षांपूर्वी फक्त एकच मुस्लिम आमदार पुण्यातून अमिनुद्दिन पेनवाले निवडून गेले होते त्यानंतर कधीही मुस्लिमांना पुण्यात संधी मिळाली नाही. महाविकास आघाडी कडून यावेळी उमेदवारी द्यावी अशी मागणी आज समस्त पुणे शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी झालेल्या बैठकीत पद्मविभूषण शरद पवार साहेब यांचा कडे मागणी करण्यात आली.

मुस्लिम धर्मगुरू मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन, मौलाना कारी इद्रिस अन्सारी, दी मुस्लिम को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन अलीरजा इनामदार, सामाजिक कार्यकर्ता अंजुम इनामदार, मुस्लिम बँक संचालक सईद सय्यद, बबलू सय्यद, सादिक लुकडे, हाजी गुलाम अहमद एज्युकेशन ट्रस्टचे मशकूर शेख, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना इकबाल अन्सारी, सोहेल खान, रफिक शेख, काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेल नदीम मुजावर, मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स गफ्फर सागर, लतीफ शेख, प्रकाश मस्के, नगरसेविका फरजाना शेख, जय हिंद महिला उद्योग अनिसा खान, इब्राहिम यवतमाळ वाला, रिटायर एसीपी जान मोहम्मद पठाण, रिटायर पीएसआय जमील शेख, युवा कार्यकर्ता आरिफ शेख इत्यादी मान्यवर शिष्टमंडळात उपस्थित होते.

पवार साहेब म्हणाले की गेल्या दहा वर्षाचा इतिहासामध्ये केंद्र सरकारला फक्त हिंदू आणि मुसलमानांमध्ये कसा धीवीकरण करता येईल याबाबतचे धोरण जास्त दिसून येत असल्याचे सांगितले शरद पवार पुढे म्हणाले की नुकताच झालेल्य लोकसभा निवडणुकीत धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी 410 चा आकडा पार करण्याची भाषा करणारे देशाची घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या पक्षाला यावेळी मुस्लिम समाजाने ताकतीने रोखण्याचा काम केले आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर असे दिसून आले की पहाटे सकाळी लवकर मुस्लिम बांधव आणि महिलांनी मतदानासाठी मोठी लाईन लावली होती. जितका गांभीर्याने मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत पुढे येऊन मतदान केले तसेच यंदाही विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी पुढे येऊन धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करावे असे आव्हान केले.

मुस्लिम समाज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत अनेक वर्षापासून आहे पण यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व उमेदवारांना व शिवसैनिकांना मुस्लिम समाजाने स्वीकारून एक नवा इतिहास घडविले आहे.

काही दिवसातच अधिकृत घोषणा विधानसभेचे होणार असून लवकरच त्याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून योग्य ते निर्णय घेऊ पक्षाची भूमिका असेल की यावेळी जास्तीत जास्त आमदार मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी करणारे विधिमंडळात गेले पाहिजे याबाबत आम्ही प्रयत्नशील राहू असेही पद्मविभूषण खासदार पवार साहेब यांनी मुस्लिम शिष्टमंडळाला आश्वासन दिले