शहरातील रस्त्यांची दुरवस्था कायम; कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा येऊ देवू नका खासदार श्रीरंग बारणे अधिकाऱ्यांवर संतापले

0
92

देहूरोड, दि. ०१ (पीसीबी) : देहूरोड कॅन्टोन्मेंटलगतच्या महापालिका हद्दीतील किवळे, रावेत भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नवीन रस्ते करावेत. स्मशानभूमीचे काम सुरू करावे. शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. थेरगाव येथील बोट क्लबची दुरुस्ती करावी. साफसफाई नियमित करावी. शहरात खासदार, आमदार निधीतून ठिकठिकाणी ओपन जिम सुरू केल्या आहेत. तेथील साहित्याची मोडतोड झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.

पाणीपुरवठा सुरळीत करा

शहरातील विविध भागातून अपुरा, कमी दाबाने, पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा. नवरात्र उत्सव सुरू होत आहे. त्यानंतर दिवाळीचा मोठा सण आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत होता कामा नये असे निर्देश खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करा

बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाची शिल्लक किरकोळ कामे तत्काळ पूर्ण करावीत. यासह शहरातील पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.