……… जागा निवडून आणल्या तर राजकारण सोडून द्याल का? मनोज जरांगेचं छगन भुजबळांना चॅलेंज

0
4

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय फैरी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मराठा आंदोलन पेटल्यानंतर त्याविरोधात ओबीसी आंदोलन उभं करण्यात छगन भुजबळ यांनी जाहीर प्रयत्न केले. ओबीसी आरक्षण बचावच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील ओबीसी एकवटण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाचा ओबीसीत समावेशासाठी जरांगे आग्रही आहेत. तर मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका यासाठी भुजबळांनी दंड थोपाटलेले आहेत. आता जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचं हे आव्हानं स्वीकारलं आहे.

वेळ आल्यावर सांगू. त्यांना दम निघणार नाही, असा चिमटा जरांगे पाटील यांनी भुजबळांना काढला. तुम्ही ८ म्हणता आम्ही १६ जागा निवडून आणल्या तर तुमचं आरक्षण सोडणार का? आम्हाला ओबीसीत घ्याल का ? धनगरांना एसटीत आरक्षण देणार का? राजकारण सोडून द्याल का? गोरगरीबाला विरोध चाललाय तो बंद कराल का? ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला विरोध करत आहात ते बंद करणार का? अशा प्रश्नांच्या फैरी जरांगेंनी चालवल्या.

केवळ नुसतं बोलायचं म्हणून बोलत आहात का, असा टोला पण त्यांनी लगावला. आम्ही दुप्पट जागा आणू. तुम्ही सर्व आरक्षण सोडून देणार का. जातीय तेढ निर्माण केली त्यापासून लांब जाणार का. तुमचे विचार थांबवा ना. जाहीरपणे सांग. आम्ही १६ जागा निवडून आणतो, असे आव्हान जरांगे यांनी स्वीकारलं.

आरक्षण हा राजकीय आणि वादाचा मुद्दा नाही. याला सामंजस्य लागतं. मनाचा मोठेपणा हवा. सर्व मलाच हवं असं भुजबळांसारखा माणूस नसावा. माणुसकी धर्मातून या गोष्टीकडून पाहिलं पाहिजे. आरक्षण म्हणजे राजकारण असेल असं यांना वाटत आहे. आरक्षण म्हणजे शत्रूत्व आहे, असं भुजबळांना वाटलं पाहिजे. आरक्षणात जात तोलू नये. सुविधा, माणुसकी धर्म पाहिला पाहिजे. हा वादाचा विषयच नाही. या राजकारण्यांनी राजकीय स्वार्थासाठी गरीबांना मारलं जात आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी यावेळी केली.