बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर भाजप आमदार महेश लांडगे यांची सही, आंबेडकर प्रेमी जनतेचे आज आंदोलन

0
110

पिंपरी, दि. २९ –

प्रसिध्दीच्या हव्यासापोटी भाजप आमदार महेश लांडगे यांचा नवीन प्रताप समोर आला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर आमदारांनी चक्क स्वतःची सही छापली आहे, त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे दिसते आहे.

भाजप आमदार महेश लांडगे यांनी भारतीय संविधान भवनाची जाहिरात करत असताना ॲटो रिक्षावर ‘विचार लोकशाहीचा, अभिमान संविधानाचा’ अशी टॅगलाईन टाकून एका बाजूला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुस-या बाजूला स्वताचा फोटो छापला आहे. असे असताना आमदार यांनी स्वताच्या फोटोवर सही न करता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर स्वताची सही छापली आहे.
अशा अनेक रिक्षा सध्या पिपरी चिंचवड शहरात फिरताहेत. त्यातीलच एक रिक्षाचा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाल्याने हा विषय चर्चेत आला.

मागील काही दिवसांपूर्वी मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या १०० फूट उंचीच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले होते. आता संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर चक्क आमदारांनी स्वत:ची सही केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार असलेल्या भोसरी विधासभेत या दोन महापुरूषांचा अवमान करण्याचा प्रकार झाला आहे.
मागील वेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले होते. या संदर्भात महापालिका आयुक्तांनी देखील घाईगडबडीत स्वतः स्पष्टीकरणाचा व्हिडिओ करून या विषयावरिल लक्ष दुसरीकडे वळवण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. म्हणून यावेळी आंबेडकरवादी संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने बाबासाहेबांचा झालेला अवमान जिव्हारी लागल्याने निषेध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी संविधान भवन संदर्भातील जाहिरातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर स्वतःची सही टाकून आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा आपण मोठे असल्याचा आव आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी उद्या रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पुतळा, “भीमसृष्टी स्मारक”, पिंपरी चौक या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, असे धम्मराज साळवे व शिवशंकर उबाळे यांनी सांगीतले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणार्‍या सर्वांनी या आंदोलनास उपस्थित रहावे अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली आहे.