शेअर मार्केटच्‍या नावाखाली 28 लाखांची फसवणूक

0
4

वाकड, दि. 27 (पीसीबी) : शेअर मार्केटमध्‍ये गुंतवणूक केल्‍यास आकर्षक परतावा मिळेल, असे अमिष दाखवून एकाची 28 लाख 39 हजार 141 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 22 जुलै ते 31 ऑगस्‍ट 2024 या कालावधीत कस्‍पटे वस्‍ती, वाकड येथे घडली.

याप्रकरणी 52 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष धवन मोबाइल क्रमांक 7501039927 आणि महिला आरोपी मोबाइल क्रमांक 7005290755 (ट्रेडींग एक्स्पर्ट) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी धवन याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास आकर्षक परतावा मिळणार असल्याचा फिर्यादी यांना मॅसेज केला. फिर्यादी यांना Market information club805 नावाच्‍या व्हाटसअप ग्रुपला जॉईन केले. या ग्रुपमध्‍ये महिला आरोपीने स्वतःची ट्रेडींग एक्सपर्ट म्हणून ओळख करून दिली. त्या दोघांनी मिळून त्यांच्या टिप्सनुसार गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याचे आमिष दाखविले. तसेच इंटरनॅशनल गोल्ड ट्रेडींगमध्ये 300 टक्के प्रॉफिट असल्याचे खोटे सांगून फिर्यादी यांना MGEX app वर एकूण 28 लाख 39 हजार 141 रूपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांची संगणकीय साधनांचा वापर करून आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.