बीआरटी मार्गात खाजगी वाहनाच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

0
71

सांगवी, दि. २६ (पीसीबी) : सांगवी परिसरातील पी के चौकाजवळ बीआरटी मार्गात रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीला खाजगी वाहनाने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 30 जुलै रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणी 25 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाकर गोपाळराव भरणे (रा. पिंपळे सौदागर, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पराग प्रभाकर भरणे (वय 32, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहास गणपत भगत (रा. दत्तनगर, दिघी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील प्रभाकर भरणे हे पी के चौकाजवळील बीआरटी मध्ये पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी बीआरटीमध्ये भरधाव वेगात खाजगी वाहन (एमएच 14/एलपी 3034) आले. त्या वाहनाने प्रभाकर भरणे यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.