जेवण बनविण्‍यास नकार दिल्‍याने हॉटेलमधील वेटरवर खुनी हल्‍ला

0
93

आळंदी, दि. २६ (पीसीबी) : जेवण बनविण्‍यास नकार दिल्‍याने एकाने वेटरवर कायेत्‍याने वार करीत खुनी हल्‍ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 24) मध्‍यरात्री साडेबारा वाजताच्‍या सुमारास कोयाळी गावातील हॉटेल माथेरान येथे घडली.

आशिक अब्‍बास अली शेख (वय 31, रा. हॉटेल माथेरान, कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) असे खुनी हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या वेटरचे नाव आहे. त्‍यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आयुब अब्दुल शेख (वय ३८, रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, विनोद बरकडे यांच्‍या कोयाळी येथील हॉटेल माथेरान मधील फॅमिली रूममध्ये काही वेळापूर्वी आरोपीशी दारूच्‍या नशेत झालेल्या भांडणाच्‍या कारणावरुन तसेच फिर्यादी आशिक शेख याने जेवण बनवण्यास नकार दिला. या कारणावरून चिडून जाऊन आरोपीने माथेरान हॉटेलमधील कामगाराने फिर्यादीस शिवीगाळ व हाताने मारहाण केली. त्‍यानंतर हॉटेलच्‍या किचनमधून ऊस तोडण्याचा कोयता आणून फिर्यादीस यांना आता कायमचाच संपवतो, असे म्‍हणून कोयत्याने फिर्यादीच्‍या मानेवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.