पिंपळे सौदागर ते पिंपरीला जोडणारा समांतर पुल लवकरच वाहतुकीसाठी खुला – नाना काटे

0
51

-कामाची केली पाहणी ; वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार

चिंचवड, दि. २६ (पीसीबी) : पिंपळे सौदागर ते पिंपरीकडे जाताना पवना नदीवर नविन समांतर पुल बांधण्यात आला असून तो लवकरच नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. २६) या पुलाच्या कामाची माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पाहणी केली. पुलाच्या वाहतुकी दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना यावेळी नाना काटे यांनी दिल्या.

पिंपरीगाव पिंपळे सौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचे काम पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक बाबी तसेच वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी झाल्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता बापू गायकवाड उपस्थित होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने कामात कोणतीही कुचराई होता कामा नये अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

नाना काटे यावेळी म्हणाले, पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचे काम आता पूर्णत्वाला गेले आहे. गेल्या १०-१५ वर्षांपासून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे समांतर पुलाच्या मागणीसाठी पाठपुरावा केला. हि मागणी आता पूर्ण झाली आहे. या पुलामुळे पिंपरीतील रहिवासी तसेच रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख येथील नागरिकांना ये- जा करताना मोठा दिलासा मिळणार आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर नक्कीच वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.