गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

0
103

हिंजवडी, दि. 25 (पीसीबी) : घरगुती सिलेंडर मधून इतर सिलेंडर मध्ये चोरून, धोकादायकपणे गॅस काढणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि. 23) सायंकाळी म्हाळुंगे गावातील नम्रता गॅस सेल आणि सर्विस या दुकानात करण्यात आली.

अमर राजकुमार खिंडीवाले (वय 24, रा. बालेवाडी, पुणे. मूळ रा. कर्नाट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन लोखंडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खिंडीवाले हा म्हाळुंगे गावात नम्रता गॅस सेल आणि सर्विस हे दुकान चालवतो. त्याने त्याच्या दुकानात घरगुती वापराच्या सिलेंडर मधून इतर सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा मारून खिंडीवाले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 23 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.