नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ मुहूर्त ठरला

0
147

मुंबई, दि. 24 (पीसीबी) : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरु आहे. आता या विमानतळावरुन लवकर विमानांचे उड्डान होणार आहे. 5 ऑक्टोंबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या धावपट्टीवर विमानाची पहिली लँडिंग टेस्ट होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते अन् सिडकोचे चेअरमन आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

रन वे वर ट्रायल होणार
आमदार संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी केली. त्यावेळी त्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केला. त्यावेळी ते म्हणाले, 5 तारखेपर्यंत एअरफोर्सचे एक विमान रन वे वर ट्रायल करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करायचा आहे. या विमानतळावर 4 टर्मिनल आहे. त्या ठिकाणी जवळपास 350 विमाने एकाच वेळी पार्क करू शकतो.

मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी करणार
नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील भारही कमी होणार आहे.