कारच्‍या धडकेत दुचाकीस्‍वार जखमी

0
86

भोसरी, दि. 24 (पीसीबी) : भरधाव वेगातील कारने धडक दिल्‍यामुळे झालेल्‍या अपघातात दुचाकीस्‍वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास पुणे नाशिक रोडवर भोसरी येथे घडली.

संकेत मोहन घुले (वय 20, रा. च-होली) असे अपघातात जखमी झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील गोरखनाथ माने (वय ३३, रा. वडगाव, सिंहगड रोड, कात्रज, पुणे) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी व त्‍यांचा मित्र अभिषेक दांडगे हे दोघेजण शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास दुचाकीवरून च-होलीहून चिंचवडच्‍या दिशेने जात होते. ते पुणे नाशिक रस्‍त्‍यावरील भोसरी येथील सीआयआरटी समोर आले असता आरोपी चालवत असलेल्‍या कारने फिर्यादी घुले यांच्‍या दुचाकीच्‍या बंपरला धडक दिली. यामुळे झालेल्‍या अपघातात फिर्यादी यांच्या उजव्‍या हाताचे हाड फॅक्‍चर झाले. तसेच सहप्रवासी अभिषेक दांडगे हे देखील जखमी झाले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.