पिंपरी, दि. 24 (पीसीबी) : 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या वेळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांत पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
छायाचित्र प्रदर्शन – भारतीय वारसा स्थळे, छायाचित्रकार: श्री तुषार कोडोलिकर, 27, 28 व 29 सप्टेंबर 2024, स. 10:30 ते सायं. 05:30
तज्ञांची व्याख्याने – दु. 04:00 ते 05:30
भारतीय वारसा स्थळे, दुर्गभ्रमंती व पर्यटन, वक्ते: श्री अनुराग वैद्य, श्री विनायक बेलोसे, 27 सप्टेंबर (शुक्रवार)
नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरील पक्षी: निरीक्षण, पर्यटन आणि संवर्धन, वक्ते: श्री सुशांत पवार – 28 सप्टेंबर (शनिवार)
विज्ञान भागीरथीचे भगीरथ, वक्ते: श्री विठ्ठल रायगावकर – 29 सप्टेंबर (रविवार)
27 तारखेला खास शालेय विद्यार्थांसाठी ‘ गिरिदुर्ग व स्थापत्य शास्त्र दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व ‘ या विषयावरील आंतरशालेय स्पर्धा देखील होणार असून अनेक शाळांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
विविध नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या, अनेक वारसा स्थळे जपणाऱ्या आपल्या देशात पर्यटन करताना जागरूक व जबाबदार पर्यटक कसे व्हावे याबद्दल या कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात येणार आहे. पर्यटनाची आवड असणारे नागरिक, तसेच शाळांनी हा दिवस साजरा करण्यात उत्स्फूर्ततेने सहभागी होऊन कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. सदरच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील.