मालवली ,दि. २३ (पीसीबी) :
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये लोहगड किल्ल्याचे नामांकन झाले असून या किल्ल्याच्या पाहणीसाठी राज्य केंद्र व युनेस्कोचे अधिकारी भेट देणार आहेत. लोहगड किल्ला हा इतिहासाची साक्ष देतो. लोहगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारसा जपणूक करण्यासाठी व त्याचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरेवाडी व लोहगड तसेच अंगणवाडी केंद्र लोहगड व घेरेवाडी यांच्या वतीने किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली. याप्रसंगी शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत किल्ल्याच्या पायथ्यापासून ते किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंतच्या सर्व पायऱ्या तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत जिल्हा परिषद सदस्य सौ. अलकाताई धानिवले, सरपंच सौ. सोनालीताई बैकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश तात्या धानिवले उपसरपंच पंढरीनाथ विखार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौ. कविताताई विखार व सर्व पदाधिकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी माननीय भागवत साहेब सहभागी होते. या स्वच्छता मोहिमेचे आयोजन व नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरेवाडी व लोहगड शाळेचे शिक्षक बाबासाहेब काळे, अतुल वाघ, प्रियदर्शन भालेराव व सागर भांगरे यांनी केले. किल्ला स्वच्छ्ता मोहिमेत सर्व सहभागींचे आभार श्री. बाबासाहेब काळे यांनी मानले.