दगडाने ठेचून तरुणाचा खून

0
97

तळेगाव, दि. २३ (पीसीबी) : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा खून झाला. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या डोक्यात दगड मारून त्यास ठार मारण्यात आले.

अभिनंदन सारा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद कुमार (वय 23) याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन आणि प्रमोद हे दोघेही बिहार राज्यातील आहेत. ते कामाच्या निमित्ताने मागील काही महिन्यांपूर्वी तळेगाव एमआयडीसी परिसरात आले होते. अभिनंदन सारा हा नानोली येथील एका कंपनीत काम करत होता. दोघांमध्ये उसनवारीने पैसे देण्यावरून भांडण होते. रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. प्रमोद कुमार याने अभिनंदन याच्या डोक्यात दगड मारून त्यास ठार मारले.

घटनेची पोलिसांना माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी काही वेळेत प्रमोद कुमार याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.