शेअर्स बाजाराच्या नावाखाली सीए ची फसवणूक

0
2

निगडी, दि. २३ (पीसीबी) : शेअर्स बाजाराच्या नावाखाली एका सीएची फसवणूक करण्यात आली. ही घटना आकुर्डी आणि निगडी येथे घडली.

दत्तात्रय शामराव विभुते (वय 47, रा. पेठ क्रमांक 27, प्राधिकरण, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 34 वर्षीय सीए ने रविवारी (दि. 22) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 डिसेंबर 2022 ते फेबु्रवारी 2024 या कालावधीत आकुर्डी आणि निगडी परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीची ओळख शेअर्स मार्केटच्या क्लासमध्ये झाली. इन्व्हेसमेंट प्लॉनमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा तीन ते पाच टक्के परतावा मिळेल, असे आमिष फिर्यादी यांना दाखविले.

फिर्यादीचा विश्वास संपादल करून 13 डिसेंबर 2022 रोजी आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 16 लाख 50 हजार रुपये आणि चार लाख रुपये घेतले. ट्रेडमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांचे डिमेट अकाऊंट वापरून 13 लाख 65 हजार 38 रुपयांचे शेअर्स इन्फोेलाईन कंपनीकडे प्लॅज (गहाण) ठेवून सदर शेअर्स विकण्यास भाग पाडून असे एकूण 34 लाख 15 हजार 28 रुपये घेतले. त्यापैकी 13 लाख 65 हजार 38 रुपये व एक लाख 85 हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम व परतावा न देता आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून 18 लाख 65 हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केली.