गोल्ड लोनचे ऑफिस फोडणा-यास अटक

0
92

चाकण, दि.२३ (पीसीबी) : गोल्ड लोनच्या कार्यालयाची भिंत फोडणा-यास रुग्णालय कर्मचारी व रूग्णवाहिका चालकाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना शनिवारी (दि. 22) पहाटे तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ॠषीकेश बाबुराव शिंदे (वय 21, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोसिांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांना सिक्युरिटी गार्ड विकास गायकवाड यांचा फोन आला की त्याच्या फ्री गोल्ड लोनचे ऑफिसची पाठीमागील भिंत एका चोरट्याने फोडली आहे. त्या चोरट्याला हॉस्पिटलचे कर्मचारी, रुग्णवाहिका चालक व तेथील लोकांनी पकडून ठेवले आहे. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी व कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयात आले. त्यावेळी पोलिसही आले होत. कॅपरी गोल्ड लोनच्या पाठीमागील सिमेंट विटांची भिंत गोलाकार तुटलेली दिसतली. तसेच घटनास्थळी पक्कड, पहार, हातोडी पडलेली होती. नागरिकांनी चोरट्याला पकडून ठेवले होते. फिर्यादी यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली असता त्यांना ऑफिसमधील सोने, रोख रक्कम चोरीला गेली नसल्याचे दिसून आले. मात्र भिंत फोडून नुकसान केले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.