हॉटेलमध्ये हुक्का पिणे पडले चांगलेच महागात; घडले…….

0
107

रावेत,दि.२३ (पीसीबी) : रावेत पोलिसांनी ताजणे वस्ती येथील एका हॉटेलवर कारवाई केली. हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होते. ही कारवाई शनिवारी (दि. 21) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रोशन रवींद्र म्हसकर (वय 31, रा. शिंदे वस्ती, रावेत. मूळ रा. मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रमेश तांबे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन भास्कर हा हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. त्याने त्याच्या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी करून हुक्का पिण्यास एकत्र बसवले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रावेत पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 27 हजार 100 रुपये किमतीचे हुक्कापॉट आणि हुक्का फ्लेवर जप्त केले आहेत. रावेत पोलीस तपास करीत आहेत.