पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मिळाली; पोलिसांनी रचला सापळा

0
82
crime

शिरगाव, दि.२३ (पीसीबी) : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 22) सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबडओहोळ येथे करण्यात आली.

अमर उत्तम शिंदे (वय 24, रा. परंदवडी, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबडओहोळ ते परंदवडी या मार्गावर एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अमर शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 40 हजार रुपये किमतीचे एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्तूल आणि 200 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहोत.