अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला

0
76

मुंबई, दि. २३ (पीसीबी) : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा नववा आठवडा सुरू झाला असून सध्या शोची प्रचंड चर्चा सुरू आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात आठव्या आठवड्यातील एलिमिनेशन प्रक्रिया पार पडली. आठव्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी अरबाज, निक्की, वर्षा, सूरज आणि जान्हवी हे सदस्य नॉमिनेट झाले होते. दरम्यान, अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला असून तो एलिमिनेट झाला आहे. कॅप्टन म्हणून एलिमिनेट होणारा अरबाज हा पहिला स्पर्धक असून बिग बॉस मराठीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत आहे. अशातच कलर्स मराठीने अरबाज घराबाहेर पडताच पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर मराठी अभिनेत्याने कमेंट करत अरबाजला त्याच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या असून त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर योगिताच्या भेटीसाठी पोहोचली आर्या

बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज आणि निक्कीने एकत्रच प्रवेश केला असून ते पहिल्या दिवसापासून एकमेकांना साथ देत आले आहेत. बिग बॉसच्या घरात असेपर्यंत एकत्र राहणार आणि एकत्रच खेळणार असा त्यांचा गेम प्लॅन होता. मात्र ते शक्य झालं नाही. अरबाजचा खेळ कायमच चांगला राहिला आहे. पण निक्कीसाठी मी खेळणार हे त्याचं वक्तव्य प्रेक्षकांना खटकलं. अरबाजला निक्कीचा डोअरमॅट म्हणून देखील संबोधण्यात आलं होतं. अरबाज घराबाहेर जाणार हे ऐकल्यावर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनासुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला.