बनावट स्‍वाक्षरी करणार्‍या महिलेवर गुन्‍हा दाखल

0
95

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : वीज बिलात नाव लावण्‍यासाठी तसेच सुरक्षा ठेव हस्तांतरीत करण्‍यासाठी असलेल्‍या अर्जावर बनावट स्‍वाक्षरी करणार्‍या महिलेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना १५ सप्‍टेंबर रोजी खराळवाडी येथे घडली.

भुजंग दत्‍तात्रय बाबर (वय ५०, रा. चर्‍होली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी भुजग हे पिंपरीतील खराळवाडी येथे असलेल्‍या महावितरणच्‍या कार्यालयात अतिरिक्‍त कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. महिला आरोपी हिने ऑनलाइन ॲप्‍लीकेशन क्रमांक ५०८३४५८३ याद्वारे नीलेश राजू पवार यांच्‍या नावाच्‍या विज बिलात नाव लावण्‍यासाठी तसेच सुरक्षा ठेव हस्‍तांतरीत करण्‍यासाठी नीलेश राजू पवार यांच्‍या संमती शिवाय बनावट स्‍वाक्षरी करून शासनाची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.